नृसिंह आरती
फोडोनि स्तंभ अवतार झाला । नरशार्दूल देह धरिला ।
बाळ प्रह्वाद कारण तो झाला । दैत्य सुदना नरहरी आला ।।१।।
जयदेव जयदेव जय नरहरी राया । आरती ओवाळितो निवारी रे माया ।।धृ ।।
कोंदले अंबर प्रचंड ध्वनी । उग्र गर्जना दैत्याच्या कानी ।
शंख चक्र गदा हाती धरोनि । ऐसा नरहरी पहिला जनीं ।।२।।जयदेव०
गर्जोनि दैत्यांते आवाहन दिले । धग धग धग धगीत रण चालिले ।
सायं संध्येसी दैत्या विदारिले । नरसिंह देवे जण तारियेले ।।३।। जयदेव०
धरिला अवतार वैशाख मासीं । भक्तवत्सला सौभाग्य देसी ।
ऐसी विनंती देवा तव पायी । मिलिंदाग्रज आरती ओवाळि ।।४।।जयदेव०
