मागील भागात आपण शक संवत्सराबद्दल जाणून घेत असतांना भारतीय कालगणनेतील प्रत्येक संवत्सराचा नाव देण्याची पद्धत आहे हे आपल्या लक्षात आलेले असेलच.
उदाहरणार्थ : या चैत्र प्रतिपदेपासून सुरु झालेल्या १९३९ व्या संवत्सराचे नाव आहे, हेमलंबी. तसेच कार्तिकात सुरूझालेल्या २०७३ व्या विक्रम संवताचे नाव आहे किलक..
संवत्सर चक्र :
एकंदरीत साठ संवत्सरांचे एक चक्र मानतात. येथे संवत्सर हा शब्द एक वर्ष या अर्थाने वापरला आहे.
एक साठ वर्षाचे चक्र संपले कि, पुन्हा संवत्सराला पहिल्या नावावरून सुरुवात होते. या साठ वर्षांची नवे पुढील प्रमाणे आहेत:
प्रभव, विभव, शुक्ल,प्रमोद, प्रजापति, अंगिरा, श्रीमुख, भाव, युवा, धाता, ईश्वर, बहुधान्य, प्रमाथी, विक्रम, वृष, चित्रभानू, सुभानू,तारण, पार्थिव, व्यय, सार्वजित , सर्वधारी, विरोधी, विकृत, खर, नंदन, विजय, जय, मन्मथ, दुर्मुख, हेमलंबी, इत्यादी
चैत्री नवरात्राचा आजचा तिसरा दिवस, जगद्जननीचे आणि श्री राघुनंदनाचे स्मरण करून आजची लेखमाला इथेच संपवतो..
वरदां राम जननीं जमदग्निप्रियां सतीम् ।
एकवीरां महामायां ध्यायामि रेणुकां भजे ॥
लोकाभिरामं रनरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ।
कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा