देवीचे तिसरे रूप आहे चंद्रघंटा देवी...
चंद्राप्रमाणे निर्मळ असलेल्या देवीचं ध्यान करतात:
पिण्डजप्रवरारूढा चन्द्रकोपास्त्रकैर्युता ।
प्रसादं तनुतां मह्यं चन्द्रघण्टेति विश्रुता ॥
या देवीच्या उत्पत्ती विषयी कथा अशी की:
देव - दानवांच्या घनघोर युद्धात देवतांचा पराजय झाल्यानंतर सर्व देवता ब्रह्म देवाकडे साह्य मागण्यासाठी गेले. ब्रह्मदेव सर्वांना घेऊन श्रीविष्णू आणि शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले. देवतांनी आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती देताच, ब्रह्मा, विष्णू व माहेशांना अत्यंत राग आला. या क्रोधामुळे तिघांच्याही मुखातून एक तेजोवलय बाहेर आले व त्या तेजोवलयाच्या एकत्रीकरणातून या देवीचा प्रादुर्भाव झाला. त्या नंतर सर्व देवतांनी देवीला एक एक अस्त्र बहाल केले. इंद्राने देवीला अलौकीक घंटा प्रदान केला. ह्यादेवीचा शिरावर चंद्र असून त्याचा आकार घंटेसारखा आहे त्यामुळे देवीला चंद्रघंटा म्हणून ओळखल्या जाते.
देवी चंद्रघंटा ही मानवी मानसंबंधीची, मानसिकतेची देवता आहे. 'चंद्रमा मानसो जाता....' चंद्र हा मनाचा कारक आहे असं वर्णन पुरुषासूक्तात आलेलं आहे..चंद्राच्या कलांप्रमाणे मानवी मन सुद्धा आकुंचित आणि प्रसारण पावतं. तर घंटा हे अनाहत नादच प्रतीक आहे. घंटेतून निर्माण होणारा ध्वनी आपल्याला वर्तमानात घेऊन येतो. स्वत्वाची जाणीव घडवून आणतो. म्हणून चंचल मनाला अनाहत नादाने वर्तमानात आणणारी देवी श्री चंद्रघंटा......
चन्द्रमुखी इष्टदात्री इष्टमन्त्रस्वरूपणी ।
धनदात्र्यानन्ददात्री चन्द्रघण्टे प्रणमाम्यहम् ॥

Nice.
उत्तर द्याहटवाGood one
उत्तर द्याहटवा